प्राथमिक आरोग्य केंद्र कोरा अंतर्गत स्वास्थ्य नारी सशक्तपरिवार अभियानाचे आयोजन,

प्रतिनिधी विलास लभाने समुद्रपूर
वर्धा:अंतर्गतआज दिनांक 29/9/2025 ला प्राथमिक आरोग्य केंद्र कोरा येथे *स्वस्थ नारी सशक्त परिवार* अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले,अभियानाचे मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे महिलांचे आरोग्य सुधारणे, महिलांमध्ये ऍनिमया (रक्तक्षय) आणि इतर आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करणे,महिला व बालकांचे पोषण सुधारणे आणि त्यांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवणे,आरोग्य सेवा सुलभ करणे, आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य तपासणी आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देणे होते, यावेळी कोरा येथील सरपंच मॅडम,जिल्हा परिषद अध्यक्ष, उपसरपंच तसेच ग्रामपंचायतचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भगत सर व डॉक्टर विलास साठवणे सर प्राथमिक आरोग्य केंद्र कोरा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले,व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, यावेळी बालरोग तपासणी करण्यात आली, स्त्री रोग तपासणी करण्यात आली,आयुष्मान कार्ड काढण्यात आले,एनसीडी कॅम्प घेण्यात आला,मोफत औषध वाटप करण्यात आले, पोषक आहाराबद्दल माहिती देण्यात आली व प्रत्यक्ष पोषक आहार दाखविण्यात आले, तसेच आशा स्वयंसेवीकेने स्त्रीच्या दैनंदिन कामाचे प्रदर्शन नृत्याच्या सहाय्याने दाखविले, या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र कोरा व अंतर्गत उपकेंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी, आशा गटप्रवर्तक.व आशा स्वयंसेविका यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून अभियान यशस्वीरित्या पार पाडण्यास मदत केली.