समाजात एकोप्याची भावना रुजविण्याची गरज- घोडे महाराज

Thu 09-Oct-2025,05:46 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

सालोड (हि.) लहरी दुर्गा पुजा उत्सव समिती तक्का चौक सालोड (हि.) येथे राष्ट्रीय किर्तनकार तुकारामदास घोडे महाराज यांचे काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. तुकाराम दास घोडे महाराज बोलताना म्हणाले. आज या सालोड (हिरापूर) गावामध्ये जवळपास 65 वर्ष या लहरी दुर्गा उत्सव समितीला झाले. आणि या गावातील परंपरा जपत आहे. अनेक कीर्तनकारांचे कीर्तन या ठिकाणी ठेवण्यात आले. कीर्तनामुळे मनाची शुद्धी होते. संतांचे विचार मिळते व आपण कसं जगलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे याची देवाण-घेवाण कीर्तनातून होते. आणि अनेक गावांमध्ये असेच किर्तन प्रबोधनाचे उपक्रम राबवावे हे आज काळाची गरज आहे ही परंपरा अशीच राहो. आतापर्यंत जे कार्यकर्ते झाले असतील त्यांचा सुद्धा सन्मान व गौरव करण्यात आला, आता हल्ली असलेल्या मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये असाच उत्साह राहो. समाजात एकोप्याची भावना रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन घोडे महाराजांनी दुर्गा मातेच्या साक्षीने केले.

विदर्भातील नामवंत संगीतकार शैलेश देशमुख यांनी गायन व हार्मोनियम वादन केले. तबल्याची दर्जेदार साथसंगत प्रमोद तराळे, सहगायन दिलीप अतकरे, भगवंत झाडे, मारोती वैतागे, प्रशांत वैतागे तर मंजिरावादन प्रमोद झाडे केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन पत्रकार संदिप रघाटाटे यांनी केले. यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य सुरज रघाटाटे, नकुल वैतागे, शुभम मुटे, प्रविण तडस, अविनाश धानकुटे, रोशन झाडे, रामा तिमांडे, वैभव मुते, आशिष वैतागे, प्रविण लोणकर, राहुल ढगे, योगेश वैतागे, अरुण चौरसिया, नितेश वैतागे, तुषार तडस, दिपक फटिंग तसेच युवकांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक - सेविका तसेच गावकरी उपस्थित होते. सायंकाळी भव्य दिव्य महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.