शिवसेना(उ.बा.ठा)चा हंबरडा प्रती हेक्टरी 50 हजार द्या- डॉ.रेणुका पतंगे
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथील विश्राम गृह येथे आज मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व प्रती हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी, पूरग्रस्तांना 25 हजार, संपूर्ण कर्जमाफी करून तात्काळ पीक विमा मंजूर करण्यात यावा मागणीसाठी 11 ऑक्टोबर ला छत्रपती संभाजी नगर ला होणाऱ्या आंदोलना साठी मा शिवसेना नेते बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत आज शासकीय विश्राम ग्रह येथे बैठक पार पडली त्या वेळी उपस्थित जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,उपजिल्हा प्रमुख अनिल कदम,महिला जिल्हा प्रमुख डॉ रेणुका पतंगे, उपजिल्हा प्रमुख महिला मिरा पांचाळ, तालुका प्रमुख डी बी पार्डीकर,उप तालुका प्रमुख विलास नरवाडे, उपतालुका प्रमुख दळवी, शहरप्रमुख काशिनाथ भोसले,शहरप्रमुख तान्हाजी कदम,युवासेना उपजिल्हा प्रमुख ईश्वर तांबोळी,संभा दाजी बेले,नगरसेवक नरेंद्र कमळू,विठ्ठल कोरडे पाटील,शिवाजी शिंदे सर्कल प्रमुख,दत्ता नवले सर्कल प्रमुख,रामा साळवे सर्कल प्रमुख, गोविंद ढेबरे पाटील, दिलीप चव्हाण,जटी बेंडे पाटील,उत्तम कदम तसेच सर्व पदाधिकारी, शिवसैनिक,युवासैनिक, महिला आघाडी उपस्थित होते