उप जिल्हा रुग्णालय येथून रॅबिट चे औषध गायब
प्रतिनिधी:- शारुखखान पठाण वरोरा
वरोरा :- वरोरा तालुक्यातील गरीब नागरिक, रुग्णांसाठी जीवनरेखा असलेल्या अत्यंत महत्त्वाचे अशा उपजिल्हा रुग्णालयात मागील दोन दिवसांपासून ARS ( कुत्र्याच इंजेक्शन ) उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना या रुग्णालयात उपचार मिळत नाही, त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे येथील रुग्णांना चंद्रपूर रेफर केल्याने रुग्णांमध्ये तीव्र आक्रोश दिसून येत आहे.
वरोरा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय हे अत्यन्त महत्वाचे रुग्णालय असून या ठिकाणी तालुक्यातील परिसरातील अंदाजे 81 ग्रामीण गावातील रुग्णाची नेहमी वेगवेगळ्या आजारासाठी, लस या करिता नेहमी वरदळ असते. दरम्यान येथील रुग्णांनवर उपचार केला जातो, मात्र मागील दोन दिवसापासून शेख नामदार शेख करीम रां. वरोरा तसेच रोहित सुभाष हिवरकर या नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला यावर प्रतिबंधात्मक लस रॅबिट साठी उपचारासाठी रुग्णालयात आले परंतु त्यांच्यावर उपचार न झाल्याने तसेच इंजेक्शन उपलब्ध नसल्याने चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात नेहमीच रुग्णांना या त्रासाला समोरे जावे लागत असून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे नेहमीच वाद होत असतात अधिकारी कर्मचारी कायद्याचा फायदा घेत नागरिकांवर शासकीय कामात अडथळा केल्याचा ठपका ठेवतात त्यामुळे हे उपजिल्हा रुग्णालय नेहमी चर्चेत राहत, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या दुर्लक्षित पणामुळे हा प्रकार नेहमीच घडत असल्याचे दिसून येते.
नाव न सांगन्याच्या अटिवर एका वैद्यकीय अधिकारी त्यांनी माहिती दिली की या या रुग्णालयात दोन-तीन दिवसापासून रॅबिट लस उपलब्ध नाही , या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खुजेयांनी मात्र कोणत्याही प्रकारच्या लसी, औषधी चा तुटवडा नसल्याचे सांगण्यात आले.