जखमी हिमाचली शृंगी घुबड पक्ष्याला जीवरक्षक फाऊंडेशन हिंगणघाट टीमने दिले जीवनदान

Sat 11-Oct-2025,11:17 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

अल्लीपुर:दि.११.१०.२०२५ रोजी विद्या भवन हिंगणघाट शाळेत इमारतीच्या 2 ऱ्या मजल्यावर एका खोलीत पंख्यात अडकून जखमी झालेल्या घुबडाला जीवरक्षक फाऊंडेशन चे सदस्य सर्पमित्र भाविक कोपरकर व सर्पमित्र साहिल माहोरे ,ओम मेसरे यांनी सुरक्षित रित्या पकडले त्याचा एका पंखाचा भाग कापला असून त्याचा जीवरक्षक फाऊंडेशन येथे उपचार चालू आहे सदर सर्पमित्र भाविक कोपरकर यांनी सांगितले की ,

याला शृंगी घुबड असे म्हणतात.या पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या स्ट्रायजिफॉर्मिस (Strigiformes) गणाच्या स्ट्रायजिडी (Strigidae) कुलामध्ये होतो. हा पक्षी मूळचा पश्चिम बंगालमधील असून हिमालयापासून संपूर्ण भारत, पाकिस्तान, काश्मीर, नेपाळ, म्यानमार येथे आढळतो.

शृंगी घुबड एकटा किंवा जोडीने पहावयास मिळतो. हे पक्षी समूहाने कधीच राहत नाहीत. याच्या शरीरावरील पिसे तपकिरी करड्या रंगाची असतात. गळा व मानेभोवती पांढरी पिसे असून त्यावर काळ्या रंगाचे लहान पट्टे असतात. शृंगी घुबडाची लांबी ५०-५६ सेंमी., उंची ४८-५६ सेंमी. आणि शेपटी १८५-२२७ मिमी. लांब असते असे सर्पमित्र भाविक कोपरकर यांनी सांगितले सदर पक्षाचा उपचार संस्थेचे सचिव वन्यजीवरक्षक राकेश झाडे हे करीत आहे , त्याची प्रकृती ठीक झाली की वनविभाग कर्मचारी हिंगणघाट यांच्या उपस्थितीत त्याला सुरक्षित वनपरिसरात आम्ही सोडून देऊ असे सर्पमित्र भाविक कोपरकर यांनी सांगितले.