राहुल जानवे यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

Thu 13-Nov-2025,05:51 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनीधी :- शारुखखान पठाण वरोरा

वरोरा:- शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या उपस्थितीत मच्छी मार्केट, भद्रावती येथील पक्ष कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल जानवे व सीमा किशोर नरवाडे यांचा प्रवेश घेण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी विधानसभा प्रमुख बंडूभाऊ डाखरे, विधानसभा समन्वयक पंकज नाशिककर, उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते,

वरोरा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्याने कांग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, तसेच अनेक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी पक्षातील अनेक घडामोडी मुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी दुखावल्या गेले, त्यामुळे पक्षाची पुनर्बांधणी करिता अनेक पक्षाच्या कामाला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर वरोरा- भद्रावती येथील नगरपालिकेतील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने (मशाल चिन्ह) येथे सर्व १३ प्रभागांमध्ये उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतल्याने पक्षातील माजी नगरसेवक राहुल जानवे यांच्या पक्षप्रवेशने पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे, सामजिक कार्याचा वसा घेउन राहुल जानवे यांनी नागरिकांसाठी विनामूल्य अंबुलन्स सेवा उपलब्ध करून दिली, शहरातील अनेक सामाजिक मुद्याला हात घालून नागरिकांसाठी नेहमी झटत आहेत,एवढेच नव्हे तर नगरपालिका रोजगार युवकांसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याचे कार्य अविरत चालू आहे, माजी नगर उपाध्यक्ष राहुल जानवे यांच्या शिवसेनेत झालेल्या पक्षप्रवेशाने निवडणूकीची समीकरणे पालटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.