लोधी समाज महोत्सव 14 डिसेंबरला
प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा: श्री नवयुवक लोधी मिलन समारोह समिति गोंदियाच्या वतीने 14 डिसेंबर रविवारी रोजी सकाळी 11 वाजता भव्य लोधी महोत्सव आणि लोधी समाज युवक -युवती परिचय संमेलनाचे आयोजन जमीदारी मैदान, आमगाव रोड, फुलचूर, गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून गौशामहल हैदराबाद चे आमदार हिंदू हृदयसम्राट टी. राजासिंह लोधी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार व गोंदिया जिल्हा सहकरी बँक चे उपाध्यक्ष भेरसिंग नागपुरे राहतील राहतील . कार्यक्रमाचे उद्घाटन छत्तीसगढ चे माजी आमदार व संसदीय सचिव कोमलसिंह जंघेल यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून बालाघाट चे आमदार अनुभा मुजारे, लांजी आमदार राजकुमार कर्राहे , लोधी समाज गोंदिया चे अध्यक्ष अशोक नागपुरे, फुलचुर चे जमीदार विजेंद्रसिंह नागपुरे, आलोक चे राष्ट्रीय अध्यक्ष अनंतलाल दमाहे, गॅस्ट्रोतज्ञ डॉ. राजू माहुले उपस्थित रराहणार आहेत. कार्यक्रमात समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री नवयुवक लोधी मिलन समारोह समिती गोंदिया आणि लोधी समाज गोंदिया यांनी केली आहे.