नगरपंचायत निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वीच भाजपला धक्का
प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा- महाराष्ट्र मध्ये नगरपालिका महानगरपालिका व नगरपंचायत निवडणूकचा रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे व दिनांक 2,डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रचाराचा धुमाकूळ गाजलेला असून दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोज गुरुवारला दुपारी 3 वाजता महाराष्ट्र विधानसभाचे माजी अध्यक्ष व विद्यमान आमदार नाना पटोले यांची नगरपंचायत अध्यक्षपदाचे उमेदवार विजय फुंडे व नगरसेवक उमेदवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन सालेकसा बस स्टॅन्ड येथे करण्यात आले होते सदर प्रचार सभेत नाना पटोले यांनी फडणवीस सरकार व मोदी सरकारवर चांगली जोरदार टीका करत सन 2014 पासून भाजप सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता भुलथापा देत आहेत.भाजपचे नेते गर्दी दाखवण्याकरिता पैसे देऊन बाहेरू गावच्या नागरिकांना गर्दी जमवण्याकरिता आणत आहेत असा आरोप करत काँग्रेसच्या सर्व 17 वार्ड मधील नगरसेवक उमेदवार व नगरपंचायत अध्यक्ष पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले सदर प्रचार सभेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांनी सांगितले की भाजप हा शेतकऱ्यांचा कधीच भला करू शकत नाही व संविधान बदलण्याची भाषा नेहमी वापरत आहेत उपस्थित बऱ्याच मान्यवरांनी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत भाजपला चांगलाच घाम फुटलेला आहे
प्रचार जाहीर सभेचे सूत्रसंचालन सुनील हत्तीमारे यांनी केले आभार प्रदर्शन यांनी मांडले उपस्थित सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.आमदार नाना पटोले यांच्या झालेल्या प्रचार सभेला संबोधित करण्यापूर्वीच भाजपचे माजी समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष व माजी सरपंच गिरोला येथील परसराम फुंडे, भाजपचे आदिवासी नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मडावी यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे, त्यामुळे ही नगरपंचायत निवडणूक कदाचित भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.या प्रचार सभेत जिल्हा जिल्हा सेवानिवृत्त उपमुख्य कार्यपालन अधिकारी व काँग्रेसचे नेते राजकुमार पुराम ,जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे,उषा मेंढे,गीता लिल्हारे,पंचायत समिती सभापती विना कटरे,उपसभापती जितेंद्र बल्हारे, डिस्ट्रिक सेंट्रल को.ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक यजेंद्र बंटी कटरे,एडवोकेट दुष्यंत किरसान, राजू दोनोडे, पंचायत समिती सदस्य रेखा फुंडे,लखनलाल अग्रवाल,पुरुषोत्तम बाबा कटरे, शैलेश बहेकार यांच्यासह काँग्रेसचे आजी-माजी व दिग्गज पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित तसेच मतदार बंधू भगिनी महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.