मनरेगा बंद करून VB–GRAM–G योजना लागू केल्याच्या निर्णयाविरोधात वर्धा जिल्हा काँग्रेसचे लाक्षणिक उपोषन

Mon 12-Jan-2026,01:08 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा:वर्धा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही यूपीए सरकारने २००५ साली सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी व लोककल्याणकारी योजना होती. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना दरवर्षी १०० दिवसांपर्यंत अकुशल रोजगाराची हमी देण्यात येत होती. ग्रामीण उपजीविकेची सुरक्षा, रोजगाराचा अधिकार (Right to Work) आणि सामाजिक संरक्षण देणारी ही योजना पाणी व्यवस्थापन, वनसंवर्धन तसेच ग्रामीण पायाभूत सुविधा विकासावर केंद्रित होती.

१८ वर्षांवरील कोणताही ग्रामीण नागरिक मनरेगाअंतर्गत अर्ज करून रोजगार मिळवू शकत होता. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कामाची संधी आणि त्याबदल्यात मजुरी मिळत असल्याने ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरली होती.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, केंद्रातील भाजपप्रणीत मोदी सरकारने मनरेगा योजना बंद करून VB–GRAM–G योजना लागू केल्याच्या निर्णयाविरोधात वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीने आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. मनरेगाच्या मूळ संकल्पनेतून ग्रामीण जनतेला रोजगाराचा कायदेशीर अधिकार देण्यात आला होता, मात्र नव्या योजनेमुळे हा अधिकार डावलला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

या निर्णयाच्या निषेधार्थ दि. ११ जानेवारी २०२६ रोजी वर्धा येथे जिल्हास्तरीय एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सिव्हिल लाईन्स परिसरात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पार पडले. आंदोलनाचे नेतृत्व मनोज चांदुरकर, जिल्हाध्यक्ष, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केले.

यावेळी अभयुदय मेघे, सुधीर पांगुळ, धर्मपाल ताकसांडे, बाळा माऊस्कर, सुनील कोल्हे, अरुणा धोटे, अर्चना सोमवंशी, भाग्यश्री वानखेडे, नरेंद्र मसराम, सतीश आत्राम, राजीव कंगाले, मंगेश खेडकर, अविनाश इंदुरकर, नंदकुमार वानखेडे, राजू झांबरे, परवेज खान, कन्हैया छांगाणी, प्रशांत तळवेकर, चंद्रशेखर घोडे, अविनाश उबाळे, अक्रम पठाण, सुनील सोमवंशी, नंदकुमार कांबळे, सागर सबाणे, अंकुश मुंजेवार, विशाल ठवरे, भास्कर पांडे, चंद्रशेखर जोरे, चंद्रशेखर वनसकर, शिवम मांडगावकर, श्रावण सलाम, परेश देशमुख, अभिजीत चौधरी, पराग भोयर, प्रितेश देशमुख, विजय नरांजे, चंदू लाखे, नरेश तुपे, मनोजकुमार देशमुख, विलास कोरले, मिलिंद ढाले, पंकज काचोळे, राजीव वानखेडे, प्रफुल कुचेवार, अमर देशमुख, बाबाराव उडाण, सौरभ शेळके, तेजस ढाले, पूजा ढाले, मयुरेश देशमुख, श्रीकांत धोटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.