काचनगांव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सतिश कापसे यांची निवड

Thu 22-Jan-2026,08:47 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपूर

हिंगणघाट:हिंगणघाट तालुक्यातील काचनगांव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने पूर्ण झाली. 

सरकारच्या शाळा व्यवस्थापन समितीबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांनुसार,निवड प्रक्रिया पालकसभेतून करण्यात आली.गेली दोन वर्षे कार्यरत असलेले, शाळेचा दोन वर्षात चेहरामोहरा बदलणारे, शाळेत वाढता लोकसहभाग, शाळेकरिता विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून अनेक सुविधा कार्यान्वित करण्यासाठी झटणारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतिश कापसे यांच्यावर पुन्हा एकदा जनतेने विश्वास टाकत अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच सिमा कुंभारे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली .

पालक प्रतिनिधी म्हणून, समितीमधील विविध घटकांचा समतोल राखून सदस्यांची निवड करण्यात आली आहे. पालकांमधून योगेश माहुरे,राजेश भलमे,पवन खोंड, सोनू कापसे,प्रिया आदमने, सोनू गोटे,मंगला आत्राम यांची समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली. शिक्षण तज्ञ म्हणून साहिल खोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेऊन एकमताने त्यांचे नाव सुचवले. विध्यार्थी प्रतिनिधी म्हणून सार्थक कांबळे व अलविरा पठाण या दोन विध्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

 मुख्याध्यापक सुनील कुरटकर यांनी सचिव म्हणून काम पाहिले. ही बैठक मावळते अध्यक्ष सतिश कापसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि पालक-शिक्षक-समाज यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे आणि या निवडीबद्दल सर्व स्तरातून पदाधिकारी आणि सदस्यांचे अभिनंदन केले जात आहे.