हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शताब्दी जयंतीनिमित्त हिंगणघाट येथे शिवसेनेतर्फे वृद्धाश्रमात स्नेहभोजन कार्यक्रम
हिंगणघाट | प्रतिनिधी : मंगेश लोखंडे
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त दिनांक २३ जानेवारी २०२६, शुक्रवार रोजी शिवसेना पक्षातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. उपमुख्यमंत्री व पक्षाचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच पक्षाच्या सचिव व विधानपरिषद सदस्या डॉ. मनीषाताई कायंदे, लोकसभा संपर्कप्रमुख श्री. राजजी दीक्षित, जिल्हाप्रमुख राजेशभाऊ सराफ, बाळाभाऊ शहागडकर, शुभांगीताई ठमेकर व उपजिल्हाप्रमुख अमितभाऊ गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
त्याच अनुषंगाने हिंगणघाट शहरातील शहालंगडीजवळ असलेल्या प्रेममंदिर वृद्धाश्रमात शिवसेना पक्षाच्या वतीने समस्त वृद्धांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख (हिंगणघाट विधानसभा) अमितभाऊ गावंडे, समुद्रपूर तालुकाप्रमुख अविनाश जामुनकर, तालुकासचिव सारंग कोयाडवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना हिंगणघाट शहरप्रमुख दिनेश काटकर यांनी केले. प्रारंभी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी राहुल फुलझेले, अनुप गेडाम, विशाल माथनकर, मंगेश लोखंडे, मिलिंद झरकर, अमोल देशपांडे, आशिष कैकाडे, मनीषाताई गेडाम, पल्लवीताई सराटे, अश्विनीताई गेडाम, मंदाकिनीताई ढाले, शीतलताई तिवारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी वृद्धाश्रमाचे काळजीवाहक राजूभाऊ म्हैसकर यांना कार्यक्रमाच्या स्मरणार्थ वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शिवसेना पक्षाच्या वतीने भेट देण्यात आला.