पिपरी मेघे येथे स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Thu 29-Jan-2026,03:29 AM IST -07:00
Beach Activities

पिपरी मेघे येथे स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण

वर्धा येथील पिपरी मेघे, वार्ड क्रमांक ६ येथे नवयुवक शारदा मंडळाच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत शहीद झालेल्या स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच मेणबत्त्या प्रज्वलित करून उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली.

या श्रद्धांजली कार्यक्रमास काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे, भाजपचे माजी सरपंच अजय गौळकर, भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य प्रफुल मोरे, भाजप महिला आघाडीच्या प्रमुख अर्चनाताई वानखेडे, बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, मेजर भानुदास सोमनाथे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कळसाई व राजेंद्र भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच नवयुवक शारदा मंडळाचे अध्यक्ष तुषार देवगिरीकर यांच्यासह साहिल गवळी, शुभम मांडवगडे, अमन श्रीवास्तव, श्रेयस कामनापुरे, अनिकेत हिवरे, विराज कामनापुरे, सुशांत हांडे, हर्षल ढोबळे, नील तुपकरी, राहुल मैद, कार्तिक गवळी, तेजस काटवे, यश ठाकरे, ओम वंजारी, आयुष कोलारकर, गट्टू मैद, यथार्थ भगत, सचिन ओली आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी परिसरातील नागरिकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. उपस्थित सर्वांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मौन पाळत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.