गर्मीपासून दिलासा देणारी उपक्रमशीलता : इतवारा चौकात पाणपोईचे उद्घाटन
गर्मीपासून दिलासा देणारी उपक्रमशीलता : इतवारा चौकात पाणपोईचे उद्घाटन
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण
वर्धा : शहरातील इतवारा चौक मित्र परिवाराच्या वतीने सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन प्रभाग क्रमांक १२ येथील नगरसेविका मोहिनी आडे व नगरसेवक अभिषेक त्रिवेदी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रम्मू सेठ, सुनील मानकर यांच्यासह इतर मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पाणपोईच्या माध्यमातून नागरिकांची सेवा केली जात आहे. यंदा विशेष उपक्रम म्हणून प्राण्यांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. मित्र परिवाराचे मुकुंद मसराम यांनी आपल्या प्रास्ताविकात याबाबत माहिती दिली.
तसेच नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी येथे आरओ (RO) यंत्राद्वारे शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, येणाऱ्या नागरिकांना थंड व स्वच्छ पाणी उपलब्ध होत आहे.
कार्यक्रमाला कुतुब नादिर, शेख अशरफ, मन्सूर भाई, सुरेश रोहळा, रोशन नगराळे, संतोष कोहचडे, आरिफ सय्यद, सुनील वंजारी, मुन्ना ढवळे, जफर खान आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी मातीच्या भांड्यांचेही वितरण करण्यात आले.
मित्र परिवाराच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.