यशवंत विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात
यशवंत विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात
तालुका प्रतिनिधी – सुनील हिंगे, अल्लीपूर
अल्लीपूर येथील यशवंत विद्यालयात सन १९९८ च्या दहावी व २००० च्या बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा तब्बल २५ वर्षांनंतर उत्साहात पार पडला. या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य रवी कोठेकर तसेच माजी शिक्षक राजेश मिरापूरकर, तुकाराम खाडे, एस. क्षीरसागर, अजय जयस्वाल, आर. चौधरी, एस. वाटखेडे, के. चव्हाण व आर. गावंडे यांची उपस्थिती होती.
या बॅचमधील अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असून काहींनी शासकीय नोकरी मिळवली आहे, तर काहीजण यशस्वी व्यावसायिक व प्रगतशील शेतकरी म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी माजी विद्यार्थी अमिता जयपूरकर, मंगला घोडे, धीरज चांभारे व प्रदीप राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य रवी कोठेकर यांनीही मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने वातावरण भावनिक झाले. प्रास्ताविक भारती भट यांनी केले, संचालन उज्वला घुसे व पवन जयपूरकर यांनी केले, तर आभार विनायक इंगोले यांनी मानले.