परभणीत बहुजन पँथर सेनेची धोरणात्मक बैठक; संघटन विस्तारावर भर

Sat 04-Apr-2026,10:57 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:- अशोक इंगोले हिंगोली 

परभणी:दि. ४ एप्रिल २०२६ — बहुजन पँथर सेनेची महत्त्वपूर्ण धोरणात्मक आढावा बैठक परभणी येथील सावली विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थापक तथा अध्यक्षा निशाताई बचुटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या आगामी वाटचालीवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निशाताई बचुटे यांनी संघटनेची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि भविष्यातील दिशा याविषयी मार्गदर्शन करत पदाधिकाऱ्यांना संघटनेप्रती निष्ठा राखून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

संघटन अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, नव्या सदस्यांची नोंदणी, तसेच सामाजिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याबाबत विस्तृत चर्चा झाली. या बैठकीमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी मराठवाडा संघटक राहुल डुमणे, पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम खंदारे, नांदेड जिल्हाध्यक्ष आकाश वाघमारे, परभणी जिल्हाध्यक्ष आकाश मुंडे, दाजीबा वावळे, तालुका अध्यक्ष अजय वावळे, गंगाखेड तालुकाध्यक्ष नितीन वावळे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष गोमाजी गोहाडे, तसेच हिंगोली जिल्ह्यातील अशोक इंगोले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ही बैठक संघटनेच्या पुढील कार्याला नवी दिशा देणारी ठरल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.