संघटन सृजन अभियानातून वर्ध्यात नवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष लवकरच
संघटन सृजन अभियानातून वर्ध्यात नवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष लवकरच
वर्धा | प्रतिनिधी (युसूफ पठाण)
वर्धा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार “संघटन सृजन अभियान” महाराष्ट्रासह वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, या माध्यमातून नवीन जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.
या अभियानाचा उद्देश बूथ ते प्रदेश स्तरापर्यंत पक्ष संघटना मजबूत करणे, निष्ठावान व कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी देणे तसेच गटबाजी कमी करणे हा आहे. तसेच २०२४ नंतरच्या निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषणही या मोहिमेतून करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर झारखंडच्या आमदार व वर्धा जिल्ह्याच्या निरीक्षक मा. श्रीमती श्वेता सिंग यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेश निरीक्षक प्रा. वसंतराव पुरके, किशोरजी कान्हेरे व किशोरजी बोरकर उपस्थित होते.
ही बैठक दि. ४ एप्रिल २०२६ रोजी इंदिरा सदभावना भवन, बॅचलर रोड, वर्धा येथे दुपारी २ वाजता जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ चांदुरकर यांच्या नेतृत्वात पार पडली. बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.