अपघात रोखण्यासाठी कारंजा पोलिसांचा पुढाकार; मोफत हेल्मेट वाटपातून जनजागृती

Fri 15-May-2026,11:53 AM IST -07:00
Beach Activities

अपघात रोखण्यासाठी कारंजा पोलिसांचा पुढाकार; मोफत हेल्मेट वाटपातून जनजागृती

प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा 

कारंजा : वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन कारंजा तर्फे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करत मोफत हेल्मेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. ठाणेदार प्रल्हाद मदन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर तसेच ग्रामीण भागातील वाहनचालकांना तब्बल १०० हेल्मेटचे मोफत वितरण करण्यात आले.

यावेळी नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे, विना नंबर वाहनांवर कारवाई होणार असल्याची सूचना, अल्पवयीन मुलांच्या ताब्यात दुचाकी न देणे, ओव्हरस्पीड वाहन न चालविणे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, अशा विविध मुद्द्यांवर पोलिसांनी मार्गदर्शन केले.

पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, अपघातमुक्त कारंजासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.