नेपाळमध्ये योद्धा मार्शल आर्ट अकॅडमीची सुवर्ण कामगिरी; ५ पदकांची कमाई
नेपाळमध्ये योद्धा मार्शल आर्ट अकॅडमीची सुवर्ण कामगिरी; ५ पदकांची कमाई
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत हिंगणघाटच्या कराटेपटूंनी चमकविला भारताचा झेंडा
हिंगणघाट | प्रतिनिधी : नदीम शेख
नेपाळची राजधानी काठमांडू येथे २ ते ४ जून दरम्यान जावलाखेल व्हॉलीबॉल स्टेडियममध्ये शोतोकान कराटे असोसिएशनतर्फे आयोजित १७ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये हिंगणघाटच्या योद्धा मार्शल आर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पाच पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत भारत, श्रीलंका, कतार, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान या देशांतील सुमारे ७०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. काता, कुमिते, टीम काता आणि टीम कुमिते अशा विविध प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.
भारताचे प्रतिनिधित्व करत योद्धा मार्शल आर्ट अकॅडमी, हिंगणघाटच्या खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक गोपी कोटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय यश संपादन केले.
स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :
• कु. कृत्तिका चांभरे – सुवर्णपदक (काता प्रकार)
• हिमांशू चाफले – सुवर्णपदक (कुमिते, ३० ते ३५ किलो वजन गट)
• रणवीर इंगोले – रौप्यपदक (कुमिते, २५ ते ३० किलो वजन गट)
• कु. आराध्या उघडे – कांस्यपदक (कुमिते, ३० ते ३५ किलो वजन गट)
• कु. आरोही गौतम – कांस्यपदक (कुमिते, २५ ते ३० किलो वजन गट)
याशिवाय हर्ष रघाटाटे, वेदांत सायंकाळ, वैधवी पारखी आणि लक्ष्मी वरपटकर यांनीही स्पर्धेत सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशामुळे हिंगणघाट शहरासह संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला असून पदक विजेत्या खेळाडूंवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.