दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील दडपशाहीच्या निषेधार्थ वर्ध्यात राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसचे धरणे आंदोलन

Tue 21-Jul-2026,01:07 AM IST -07:00
Beach Activities

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील दडपशाहीच्या निषेधार्थ वर्ध्यात राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसचे धरणे आंदोलन

महात्मा गांधी चौकात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

देशातील विद्यार्थी व युवकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी तसेच NEET आणि TET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर सरकारकडून करण्यात येत असलेल्या कथित दडपशाहीच्या निषेधार्थ वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवक व विद्यार्थी आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार सोमवार, २० जुलै रोजी महात्मा गांधी चौक येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रणय कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, NEET व TET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील दडपशाही थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात युवक प्रदेश उपाध्यक्ष संदीप किटे, युवक कार्याध्यक्ष सचिन पार्सडे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रणय येवले, विद्यार्थी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नऊस झाडे, स्वराग खैरकार, चेतन चोरे, नगरसेवक मुन्ना झाडे, शहराध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, प्रवीण पेठे, धनराज तेलंग, पारस चोरे, योगेश गुजरकर, राजू वाघमारे, प्रणय वानखेडे, आकाश दाते, युवक तालुकाध्यक्ष तुषार थुटे, राजू मुडे, युवती अध्यक्ष डॉ. माधवी पाटील, शिवराय संघटनेचे अध्यक्ष निखिल शेलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.