रिसामाच्या शिव मंदिरात महाशिवरात्रीचे आयोजन

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव
आमगाव कुंभारटोली रस्त्यावरील रिसामा तलावावर असलेल्या श्रद्धेचे दैवत असलेल्या शिव मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळपासून संध्याकाळ आणि रात्रीपर्यंत भाविकांनी भोले बाबांचे दर्शन घेऊन मन आणि श्रद्धा अबाधित ठेवली.भगवान शिव भोळे यांच्या मंदिरात जाऊन काँग्रेस नेते - राजकुमार पुराम, गोंदिया जिल्हा काँग्रेस सचिव - इसूलाल भालेकर, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी -संपत सोनी, सामाजिक कार्यकर्ते - प्रशांत गायधने,आदींसह मोठ्या संख्येने महिला/पुरुष आणि भाविकांनी हर हर महादेवचा जयघोष केला.सकाळपासून रात्रीपर्यंत शिवमंदिर समितीच्या वतीने आलेल्या शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाशिवरात्री उत्सव यशस्वी करण्यासाठी संजय कवडे, सुशील क्षीरसागर, रवी गि-हेपुंजे, राजू टी,कवडे, दिलीपसिंग बैस, राजू कवडे आदी शिवमंदिर समितीच्या महिला व पुरुषांनी सहकार्य केले.