एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव अंतर्गत उपकेंद्र सोमठाणा येथे योग दिन साजरा वसमत तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र सोमठाणा येथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबीर व प्रशिक्षणाचे आयोजन.योग प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे योगासने, प्राणायाम घेण्यात आली. आपले जीवन सर्वांग सुंदर करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक आहे. विविध प्राणायाम अनुलोम विलोम, सूर्यनमस्कार हास्यासन असे विविध प्रकारचे योगासने घेण्यात आली तसेच योग दिनानिमित्त गावातील साथीच्या रोगाविषयी माहिती घेण्यात आली व प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव अंतर्गत सोमठाणा येथे योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी योग प्रशिक्षक प्रवीण साळवे सर डॉ करवंदे, संगीतागिते कैलास लेकुळे आरोग्य कर्मचारी व आशा सविता लोखंडे, वंदना लोखंडे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related News
पिरीपाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदाची धुरा डॉ राजकुमार शेंडे यांच्या खांद्यावर
10 hrs ago | Sajid Pathan
घाटटेमणी वरून चालतो सालेकसा तालुक्यासह 104 गावाचा पशुवैद्यकीय दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार
24-Aug-2025 | Sajid Pathan