शेंदूरजनाघाट शहरात प्रथमच निःशुल्क महाआरोग्य शिबीर,आमदार उमेश यावलकर यांचा पुढाकार
प्रतिनीधी रवि वाहणे शेंदुरजनाघाट
वरूड:आशा चॅरिटेबल ट्रस्ट,वरूड शालिनीताई मेघे हॉस्पिटल,नागपूर व भाजपा शे.घाट च्या वतीने आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि. २७ जुन रोजी सकाळी १० ते ३ यावेळेत शेंदुरजनाघाट येथील न.प.मराठी शाळा क्रमाक १ मध्ये भव्य निःशुल्क महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची चम्मुकडून विविध आजारांची तपासणी व सल्ला तसेच मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रुग्णांकरिता मोफत वाहन सेवासुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मधुमेह तपासणीसह इतर तपासण्या व औषधी वाटप शिबीर स्थळावरच करण्यात येईल,या शिबिराच्या नोंदणीसाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत सावरकर,माजी नगरसेवक लिलाधर कुवारे,ओमप्रकाश कांडलकर,निलेश वसुले यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त संख्येने या शिबीराचा लाभ गरजुनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Related News
नेत्रहीन व अपंग घटकांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी शासनाने द्यावे प्राधान्य – इम्रान राही
6 days ago | Sajid Pathan
जखमी हिमाचली शृंगी घुबड पक्ष्याला जीवरक्षक फाऊंडेशन हिंगणघाट टीमने दिले जीवनदान
11-Oct-2025 | Sajid Pathan
प्राथमिक आरोग्य केंद्र कोरा अंतर्गत स्वास्थ्य नारी सशक्तपरिवार अभियानाचे आयोजन,
30-Sep-2025 | Sajid Pathan
पिरीपाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदाची धुरा डॉ राजकुमार शेंडे यांच्या खांद्यावर
15-Sep-2025 | Sajid Pathan