वर्ध्यात ‘शिव’शक्तीत नवा ऊर्जा संचार — AAP चे प्रमोद भोमले शिवसेनेत

अब्दुल कदिर बख्श
वर्धा:२९ जून २०२५ रोजी रविवारी वर्धा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम आदमी पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रमोद भोमले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, उपजिल्हा प्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा पार पडला.प्रमोद भोमले यांनी पक्षप्रवेशानंतर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पूर्ण ताकदीनिशी काम करण्याची ग्वाही दिली. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्क नेते अरविंद सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख रमेश जाधव आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचे आभार मानले.या कार्यक्रमास उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाने, शहर प्रमुख मिलन गांधी, तालुका प्रमुख संजय पांडे, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रशांत सातपुते, नगरसेवक मनीष देवडे, श्रीधर कोटकर, शंकर मोहमारे, प्रमोद भोयर, प्रमोद भेंडे, देवानंद चौधरी, दिवाकर कडुकर, राजू देशमुख, अरुण महाबुधे, विजय गव्हाणे, स्वप्नील वघले, वृषाल बानोकर, प्रकाश भोयर, जगन पाठक, भास्कर ठवरे, गजानन काटवले, अनंता गलांडे, सुनील आष्टीकर, शंकर झाडे, सुरेश चौधरी,भारती कोटंबकर,धनश्री थोरात, धर्मा शेंडे, नरेश भावरे, गणेश उरकुडे, धीरज पुंडकर, शकील अहमद, दिनेश धोबे, अमोल वादाफडे, भास्कर मानकर, हिरामण आवारी, दिलीप वैद्य, नाहीम शेख, चंगेश खान, गोपाल मेघरे, संदीप नरड, संजय पिंपळकर, विजय कोरडे, बलराज डेकाटे, निलेश भगत, विलास धोबे, भास्कर भिसे, डॉ. आनंद जगताप, लक्ष्मण बकाने, श्याम वाघमारे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रवेशामुळे वर्धा जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.