ग्रामपंचायत पाथरगोटा सरपंच पदाची सोडत रद्द करा पेसातूनही वगळा गाव नागरिकांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी- दिनांक 18 /7/2025 तालुक्यातील नव्याने निर्माण झालेली पाथरगोटा या ग्रामपंचायतीची सरपंच पदाची सोडत नुकतीच संपन्न झाली मात्र हा सरपंच पद अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित निघाल्याने सदर सरपंच पदाची सोडत रद्द करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे आरमोरीचे तहसीलदार उषा चौधरी यांच्या मार्फतीने निवेदनातून केली आहे पाथरगोटा येथिल नागरिकांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की 14 /7/ 2025 ला तहसील कार्यालय आरमोरी येथे आरमोरी तालुक्यातील सरपंच पदाची सोडत झाली या सोडती मध्ये पाथरगोटा या गावासाठी सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जमाती महिला साठी निघाले परंतु पाथरगोटा या गावात मुळचे रहिवासी अनुसूचित जमातीचे कायमचे नसल्यामुळे ही सोडत रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे मौजा पाथरगोटा हे गाव पळसगाव पाथरगोटा गट ग्रामपंचायत पुर्वी असल्यामुळे पेसामध्ये समाविष्ट होती पाथरगोटा ही ग्रामपंचायत नुकतीच नव्याने 20 जून 2025 ला स्थापन झाल्यामुळे आणि अनुसूची जमातीची एकही कुटुंब नसल्यामुळे पाथरगोटा ग्रामपंचायत पेसांतून वगळण्यात यावी तसेच पाथरगोटा येथील ग्रामपंचायत सरपंच पदाचे अनुसूचित जमाती महिला करिता निघालेले आरक्षण वगळण्यात यावे व संपूर्ण पाथरगोटा हा गाव पेसातून सुद्धा वगळण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय कडे केलेल्या निवेदनातून भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री भारत बावनथडे ,कैलास दोनाडकर ,संतोष प्रधान, मोतीलाल लिंगायत, सचिन चौधरी, प्रदीप दोनाडकर अशोक दोनाडकर यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे