काटोल-नरखेड विधानसभा अध्यक्षपदी योगेश नारनवरे यांची निवड

Mon 21-Jul-2025,06:57 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी: सागर वानखेडे खैरगाव 

नरखेड:नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असल्याने,भीम सेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विदर्भस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 17 जुलै 2025 रोजी नागपूर येथील भीम सेना विदर्भ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे यांच्या नेतृत्वात योगेश नारनवरे यांची काटोल-नरखेड विधानसभा अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली.नियुक्तीनंतर योगेश नारनवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भीम सेना जोरदारपणे आपले उमेदवार उभे करणार असून, बहुजन समाजाच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र केला जाईल.”या बैठकीला भदंत हर्षबोधी महाथायो (बुद्धगया), श्रीधर साळवे (राष्ट्रीय अध्यक्ष), राकेश धारगावे (नागपूर जिल्हाध्यक्ष), ज्योती बेले (महिला जिल्हाध्यक्ष), रोशन सोमकुवर (जिल्हा प्रभारी), कैलास देशभतार (जिल्हा महासचिव), प्रवीण शिंगाडे (हिंगणा विधानसभा अध्यक्ष), आनंद वानखेडे (वाडी शहर अध्यक्ष), प्रेम सोनटक्के (वाडी शहर उपाध्यक्ष) आणि नागसेन पाटिल (नागपूर जिल्हा अध्यक्ष) हे मान्यवर उपस्थित होते.भीम सेनेचा उद्देश "मिशन प्रबुद्ध भारत" अंतर्गत सामाजिक न्याय, बौद्धिक जागृती व बहुजनांच्या हक्कांसाठी निःस्वार्थपणे लढा देणे हा आहे.