4 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यातील व शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी कावड यात्रेत सहभागी होऊन सहकार्य करावे - आ.संतोष बांगर

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:कळमनुरी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत परंपरेप्रमाणे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य कावड यात्रा चिंचाळेश्वर महादेव मंदिर कळमनुरी ते ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर हिंगोली अशी निघणार आहे.लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत हिंदुत्वाचा अभूतपूर्व जल्लोष साजरा होणार असल्याने हिंगोली जिल्ह्यातील तसेच शहरातील सर्व कपडा व्यापारी असोसिएशन, किराणा व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन,आडत व्यापारी असोसिएशन व इतर सर्व व्यापारी बांधव यांना आपल्या हिंगोली जिल्ह्याची ओळख असलेल्या कावड यात्रेत सहभागी होऊन कावड यात्रेची शोभा वाढवायची आहे म्हणून सर्व शिवसैनिक,शिवभक्त, व्यापारी बांधवांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून हजारोंच्या संख्येने कावड यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.