पिण्याच्या पाण्यात नारू,लोकांचे आरोग्य धोक्यात

Sun 17-Aug-2025,12:43 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

देसाईगंज - तालुक्यातील शिवराजपूर ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या ऊसेगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल आणि इतर योजने मधून करोडो रुपये खर्च करून मागील वर्षी गावा साठी सुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या जिल्ह्यात डेंग्यू , मलेरिया सारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातलं असून काही लोकांचा बळी सुद्धा घेतला आहे आणि या प्रकरणी वैद्यकिय अधिकारी,आरोग्य सहाय्यक याना निलंबित सुद्धा केले आहे त्याच पार्श्वभूमी वर जिल्यातील सर्व यंत्रणा नागरिकांच्या आरोग्य लक्ष्यात अलर्ट मोड वर आहेत.अश्या परिस्थिती मध्येच देसाईगंज तालुक्यातील शिवराजपुर ग्राम पंचायत अंतर्गत उसेगांव येथे नळ योजनेचे च्या पाण्यात शनिवार ला सायंकाळी अजय नेवारे यांचे घरी पाण्यात नारू आढळुन आला आहे ह्यामुळे गावातील लोकांमध्ये आमचे आरोग्याची सुरक्षितता टांगणीवर तर नाही ना अशा प्रश्न गावकरी मंडळी यांना पडला आहे.त्यातच जेव्हा पासून पिण्याचा पाण्याचा टाकीच बांधकाम झालं तेव्हा पासून टाकी साफच करण्यात आली नाही असे म्हणणे गावातील नागरिकांचं आहे.या बद्दल शिवराजपूर ग्राम पंचायत च्या सरपंच सुषमा सयाम यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांचं म्हणणे आहे की पावसाळा असल्यामुळे जंतू अशू शकतात आमचे कर्मचारी नियमित ब्लिचिंग पावडर टाकून साफ सफाई करतात.