ट्रकच्या धडकेत महिलेला गंभीर दुखापत पीडितेच्या पतीने १० दिवसांनी केली तक्रार दाखल
 
                                    
                                शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बसस्थानक वरून शिवनगर येथे घराकडे जाणाऱ्या महिलेला ट्रकने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेला अगोदर बल्लारपूर, चंद्रपूर रुग्णालय नंतर एम्स नागपूर येथे भर्ती करण्यात आले. महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर तिच्या पतीने १० डिसेंबर ला ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
पीडितेचा पती पंकज सुरेंद्र झगडे (३९) हा पत्नी सतनाम पंकज झगडे आणि मुलगी लवली (५) यांच्यासह राहते. ३० नोव्हेंबर ला सकाळी ८.३० वाजता सतनाम हा तिची मुलगी लवली हिला बामणी येथील शाळेत सोडण्यासाठी बसने गेली होती. मुलीला सोडून तिने ऑटोने बल्लारपूर नवीन स्टँड गाठले व तेथून पायी शिवनगर येथील आपल्या घरी जात होते.सकाळी ९-३० वाजता त्यांना ट्रक क्रं एमएच ३४ बिझेड ५९९५ ने धडक दिली. ज्यात त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापात झाली.पिडित सतनामाचे शेजारी हरिंदर सिंग यांनी सतनामला ग्रामीण रुग्णालयात बल्लारपूर मध्ये दाखल केल.तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला पाठवले मात्र तेथेही विशेष फायदा न झाल्याने त्यांना नागपुरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.सुमारे १० दिवस चाललेल्या उपचारादरम्यान सतनामाचे पती पंकज हा तिच्यासोबत होता.१० डिसेंबर ला त्यांनी बल्लारपूर पोलिस ठाण्यात ट्रक क्रं एमएच ३४ बिझेड ५९९५ च्या चालकाविरुद्ध कलम १२५ (बि) ,२८१ अन्वये गुन्हा दाखल केला. आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय गइन्नलवआर करीत आहे.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            