बाबुपेठमध्ये युवकाकडून धारदार शस्त्रांचा साठा जप्त

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलिसांनी बाबुपेठ वार्ड परिसरात मोठी कारवाई करत धारदार शस्त्रांसह एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीचे नाव हरी पप्पु गोस्वामी (१९), रा. सोनामाता मंदिरमागे, बाबुपेठ असे असून, त्याच्या घरातून तलवार, कोयता व चाकू असा एकूण रु ५ हजार किमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.२८ सप्टेंबर रोजी सपोनी राजेंद्र सोनवणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी हरी गोस्वामी हा अटलबिहारी गार्डजवळ परिसरात धारदार हत्यार घेऊन फिरत असून दहशत माजवत आहे. तत्काळ पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता, पलंगाखाली लपवून ठेवलेली तीन धारदार शस्त्रे सापडली. त्यामध्ये लोखंडी तलवार किंमत ३ हजार रुपये, धारदार लोखंडी कोयता १ हजार रुपये, धारदार पात्याचा चाकू १ हजार रुपये असा एकूण ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ७१४/२५, कलम ४/२५ भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निशिकांत रामटेके, सपोनी राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, पोउपनि विलास निकोडे, पोहवा लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर, जावेद सिद्दीकी, निकेश ढेंगे, मपोहवा भावना रामटेके, नापोअं कपुरचंद खरवार, पोअं रूपेश पराते, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, सारीका गौरकार, दिपीका झिंगरे आदींचा समावेश होता.या कारवाईमुळे परिसरात दहशत पसरवण्याचा आरोपीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.