बाबुपेठ भागातील जुनोना मार्गावर एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Tue 30-Sep-2025,11:02 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : ३० सप्टेंबर रोजी बाबुपेठ भागातील जुनोना मार्गावर एका दुर्दैवी अपघातात ३४ वर्षीय राकेश गौतम तेलंग यांचा जागीच मृत्यू झाला.

घटना सायंकाळी ४:३० वाजताच्या दरम्यान घडली. राकेश तेलंग आपल्या दुचाकीने घराकडे जात असताना रस्त्यावर थांबलेले चारचाकी वाहन चालकाने अचानक द्वार उघडले. यामुळे राकेश यांचा दुचाकीवरील संतुलन बिघडले आणि ते थेट एसटी बसच्या मागच्या चाकाखाली सापडले. दुचाकीसह बसच्या मागच्या चाकात सापडल्यानं राकेश यांचा जागीच मृत्यू झाला.

राकेश तेलंग यांच्या कुटुंबात गरोदर पत्नी, मुलगी, आई आणि भाऊ आहेत. या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आणि अपघाताच्या ठिकाणी काही काळ तणावाची परिस्थिती होती.