तलावात उडी मारून एका तरुणाची आत्महत्या

Fri 03-Oct-2025,08:18 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बामणी येथे किरायाने राहणारा राहुल मधुकर फरकाडे (वय ३६) आज सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास बामणी येथील तलावात उडी मारून आपले जीवन संपवले.

पोलीसांना घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल मागील रात्री पेपर मिलमध्ये पाळी ड्युटी करून आला होता. मानसिक तणावाखाली असलेला तो उपचारांत होता. त्याचे मूळ गाव गोंडपिंपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील धांडे व पो.अं. संदीप थेरे करीत आहेत. त्याचे कुटुंबीयांमध्ये वडील, पत्नी व ७ वर्षाचा मुलगा आहेत. या दु:खद घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.