विसापुर येथे रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

Thu 09-Oct-2025,02:00 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वे गाडीच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना विसापुर गावात आज, ८ ऑक्टोबर रोजी घडली. मृत इसमाचे नाव मोहनमुरारी अर्जुन कोडापे (वय ६३) रा. वॉर्ड क्र. १, विसापूर असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.३० वाजता मोहनमुरारी कोडापे हे दवाखान्यात जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. ते गोंडवाना हॉल्ट स्टेशनजवळील रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या तेलंगणा एक्सप्रेस गाडीने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे आरपीएफ व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविले आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.