अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत अग्रवाल विज्ञान महाविद्यालयाच्या मुलींची बाजी

Thu 09-Oct-2025,02:22 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर द्वारा आयोजित अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेमध्ये अग्रवाल विज्ञान महाविद्यालयाच्या मुलींनी चार महाविद्यालयाच्या संघांना धूळ चारत प्रथम स्थान पटकाविले. झोन 'इ' अंतर्गत आयोजित या स्पर्धेमध्ये गोंदिया जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता पहिला सामना एम बी पटेल महाविद्यालय सडक अर्जुनी यांचे विरोधात 36/1 ने जिंकला तर दुसरा सामना एस. चंद्रा महिला महाविद्यालय सडक अर्जुनी यांच्या विरोधात 18/8 ने जिंकला त्यानंतर सलग तिसरा सामना व्ही के एम एम देवरी यांचे विरोधात 18/9 ने जिंकला व फायनल मध्ये आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर फायनल सामना एम.बी. पटेल महाविद्यालय देवरी यांच्या विरोधात 38/26 ने जिंकून ही स्पर्धा विजयी केली. ही सर्व स्पर्धा झोन इ प्रमुख डॉ. ए. के. टेंभुर्णे यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली. महाविद्यालयाकडून कबड्डीच्या संघासाठी प्रशिक्षक डॉ .संजय बिरनवार व मार्गदर्शक डॉ.शिरीनाज सय्यद यांनी खूप मेहनत घेतली. या संघामध्ये महाविद्यालयाच्या वैष्णवी पुंडकर, अलका पंधरे,आशा सोमवंशी, दामिनी बावनथडे, दिव्या पराते, काजल हटिले, प्रणवी प्रधान, रोशनी उके, संजना चंद्रिकापुरे, त्रिशा भोसकर, वंदना तुमराची, किरण मसे व नीलम मडावी यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विशाल अग्रवाल व सचिव प्रफुल अग्रवाल प्राचार्य एस. नारायण मूर्ती तसेच सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.