राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धाचे आयोजन

Sun 12-Oct-2025,02:25 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

अल्लीपुर:अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व परिवर्तन युवा मंडळ अलीपुर द्वारा आयोजित भव्य राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात येत आहे, दिनांक 13 नोव्हेंबरला उद्घाटन समारंभ सायंकाळी सात वाजता त्यानंतर हरिभक्त परायण घोडे महाराज यांचे समाज प्रबोधन पर कीर्तन कार्यक्रम,दिनांक 14 ला सकाळी नऊ वाजता चित्रकला स्पर्धा दुपारी 11 ते 2 वाजता वकृत्व स्पर्धा 2 ते 6 एकल गीत गायन स्पर्धा,सायंकाळी सहा वाजता एकपात्री प्रयोग स्पर्धा, सायंकाळी 8 वाजता पटनाट्य स्पर्धा त्यानंतर दिनांक 15 नोव्हेंबरला शनिवारी ग्रामीण गटापासून भजन स्पर्धा सुरू होईल त्यानंतर दिनांक 16 नोव्हेंबरला बालगटाची भजन स्पर्धा,सायंकाळी 7 वाजता अलीपुरातील 21 तरुणांचा सत्कार समारंभ कार्यक्रम, दिनांक 17 नोव्हेंबर सोमवारला शहरी व महिला गटाची स्पर्धा याप्रमाणे कार्तिक उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, आयोजन करण्यात आलेले असून यथाशक्ती ज्यांना ज्यांना या कार्यक्रमाला हार्दिक सहकार्य करायचे असेल त्यांनी आयोजन समितीच्या सदस्यांना संपर्क साधावा जय असे आवाहन करण्यात आले आहे