एलसीबी व बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाणे आणि एलसीबी चंद्रपूर यांच्या संयुक्त कारवाईत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून एकूण ७० हजार ९०० रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिसरा आरोपी फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनय चंद्रय्या मुलकला रा. मंचेरीयल, राज्य तेलंगणा, ह.मु. सुभाष वार्ड, बल्लारपूर यांना ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजता तीन अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून त्यांच्या हातातील मोबाईल फोन व सोन्याची अंगठी मुद्देमाल जबरीने चोरून नेला.या प्रकरणी फिर्यादी यांच्या तोंडी अहवालावरून पोलीस ठाणे बल्लारपूर येथे गुन्हा क्र. ९७५/२०२५, कलम ३०९(४), ३(५) भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तपासादरम्यान एलसीबी चंद्रपूर व बल्लारपूर पोलिसांनी समांतर तपास करून या गुन्ह्यातील दोन आरोपी सचिन (वय २४), करण सुदाम हजारे (वय २४) वर्षे, रा. गोरक्षण वार्ड, बल्लारपूर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत ५० हजार रुपये, रोख रक्कम ९०० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी किंमत २० हजार रुपये असा एकूण ७० हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, सपोनि शब्बीर पठाण, सफौ. रणविजय ठाकुर, आनंद परचाके, पोहवा. सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, पुरुषोत्तम चिकाटे, सुनील कामतकर, विकास जुमनाके, शरदचंद्र कारूष, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, सचिन अल्लेवार, शालिनी नैताम व इतर पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.या प्रकरणातील तिसरा आरोपी करण जीवने अद्याप फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास सपोनि शब्बीर पठाण हे करीत आहेत.