तुळजापूर गावात चाकू दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांवर दहेगाव गोसावी पोलिसांची कारवाई

नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा:वर्धा (दि.19 ऑक्टोबर ला दहेगाव गोसावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळजापुर गावात रात्री उशिरा चाकू दाखवून गावकऱ्यांना धमकावणाऱ्या दोघांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 19 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारास तुळजापुर गावात होंडा सिटी कार (क्र. MH/49 B/9277) मधून आलेल्या दोन इसमांनी चाकूसारखी हत्यारे दाखवत गावकऱ्यांना शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच दहेगाव गोसावी पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी आरोपींची नावे पुढीलप्रमाणे जाहीर केली आहेत सचिन उर्फ सोनू राजेंद्र कथलकर (वय 35 वर्षे)गणेश राजू मोरे (वय 24 वर्षे)दोघेही राहणार सिंदी रेल्वे, ता. सेलू, जि. वर्धा.पोलीसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून खालील मुद्देमाल जप्त केला —
एक बटन चाकू (किंमत ₹300)
होंडा सिटी कार (किंमत ₹5,00,000)
एकूण मालमत्ता किंमत ₹5,00,300 इतकी आहे. पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान तुळजापुर ग्रामस्थांनी पोलिसांना मोठे सहकार्य केले. या प्रकरणी गुन्हा क्र. 289/25, कलम 4(25) शस्त्र अधिनियम अंतर्गत दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन,अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन (ठाणेदार, पो.स्टे. दहेगाव गोसावी) यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात पो.उप.नि. होमकांत मशाखेत्री, पोलीस कर्मचारी नंदकिशोर द्रवे, आनंद भस्ने, शैलेश टेकाम, रूस्तम मुंगल यांनी केली.
दहेगाव गोसावी पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे गावात शांतता प्रस्थापित झाली असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.