कोर्टाच्या निकालानंतर सेवाग्राम पोलिसांकडून पाच लाखांहून अधिक किमतीच्या दारूसाठ्याचा नाश

Fri 30-Jan-2026,04:50 AM IST -07:00
Beach Activities

कोर्टाच्या निकालानंतर सेवाग्राम पोलिसांकडून पाच लाखांहून अधिक किमतीच्या दारूसाठ्याचा नाश

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशानुसार कारवाई

 

सेवाग्राम (वर्धा) |जिल्हा विशष प्रतिनिधि युसुफ पठाण

 

सेवाग्राम  विद्यमान न्यायालय, वर्धा यांच्या निकालानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग, वर्धा यांच्या आदेशान्वये पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे ३४ गुन्ह्यांतील जप्त दारूसाठ्याचा नाश करण्यात आला.

आज दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे जप्त करण्यात आलेल्या देशी, विदेशी व बिअर दारूसाठ्याचा नियमानुसार नाश करण्यात आला. सदर मुद्देमालामध्ये—

(१) १८० एम.एल. विदेशी दारू – १७२८ शिश्या,

(२) ३७५ एम.एल. विदेशी दारू – १३ शिश्या,

(३) ७५० एम.एल. विदेशी दारू – १२ शिश्या,

(४) ५०० एम.एल. बिअर – १०३ बाटल्या,

(५) ६५० एम.एल. बिअर – २४ बाटल्या,

(६) १८० एम.एल. देशी दारू – १४ शिश्या,

(७) ९० एम.एल. देशी दारू – ४४७ शिश्या,

असा एकूण ₹५,००,९५०/- रुपयांचा दारूसाठा समाविष्ट होता.

कोर्टाच्या अंतिम निकालानंतर व राज्य उत्पादन शुल्क विभाग, वर्धा येथील अधिक्षकांच्या आदेशानुसार सदर दारूसाठ्याचा नाश करण्यात आला. ही कारवाई पोलिस स्टेशन सेवाग्रामचे पोलिस निरीक्षक नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग, सेवाग्राम येथील पोलिस उपनिरीक्षक डी. वाय. राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी सहाय्यक फौजदार हरीदास सुरजुसे, अखिलेश यशपाला, पोलिस हवालदार हरीदास काकड, विलास लोहकरे तसेच पंच साक्षीदार म्हणून

(१) मेहमुदीन वाहबुदीन काजी (रा. पवणार),

(२) अरविंद मोतीराम लाडे (रा. पवणार),

(३) गणेश हिवरे

हे उपस्थित होते.

या कारवाईमुळे अवैध दारूविक्रीविरोधात पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठोस व कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.