रेती माफियाविरुद्ध कारवाई; ट्रॅक्टरसह ८.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त
रेती माफियाविरुद्ध कारवाई; ट्रॅक्टरसह ८.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी – आसीफ मलनस
हिंगणघाट दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट कार्यालयातील पथकाने रेती माफियाविरुद्ध कारवाई करत एका आरोपीस रंगेहात पकडले.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज गजानन देवाडे (रा. सावली वाघ, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) हा त्याच्या ताब्यातील लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH 32 AH 6883 द्वारे मौजा सावली (वाघ) येथून मौजा कडाजना येथे काळी रेतीची चोरी करून वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे मौजा कुकाबड्डी शिवारात नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, आरोपी हा ट्रॅक्टरसह एक ब्रास काळी रेती (गौण खनिज) विनारॉयल्टी वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून ट्रॅक्टर व रेती असा एकूण ८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.
कारवाईत पोलीस हवालदार राहुल साठे, उमेश लडके, अश्विन सुखदेवे, रवींद्र घाटुर्ले व सतीश घवघवे यांनी सहभाग घेतला.