तिर्थयात्रेसाठी विदर्भातून पहिली बस रवाना; “बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तिर्थाटन योजना”ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Tue 31-Mar-2026,05:22 AM IST -07:00
Beach Activities

तिर्थयात्रेसाठी विदर्भातून पहिली बस रवाना; “बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तिर्थाटन योजना”ला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगणघाट | प्रतिनिधी : मंगेश लोखंडे

२८ मार्च २०२६ (शनिवार) रोजी हिंगणघाट येथील स्थानिक बसस्थानकावरून महाराष्ट्र शासनाच्या “हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तिर्थाटन योजना” अंतर्गत विदर्भातून पहिली बसफेरी उत्साहात रवाना करण्यात आली. या बसमध्ये एकूण ४० प्रवासी सहभागी झाले असून ते मैय्यर, प्रयागराज, काशी आणि अयोध्या या प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देणार आहेत.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमित गावंडे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख, हिंगणघाट विधानसभा), मंदाकिनी ढाले (महिला आघाडी शहर विभागप्रमुख), सारंगभाऊ कोयाडवार (तालुका संघटक), रमेश ढाले, अनुप गेडाम तसेच युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या यात्रेत अळ्लीपूर, सिरुड तसेच पुणे येथील भाविकांचाही समावेश असून सर्व प्रवाशांनी उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र शासन आणि राज्य परिवहन महामंडळाचे आभार व्यक्त केले.

प्रवासादरम्यान प्रवाशांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. “जय भवानी, जय शिवाजी” आणि “हर हर महादेव”च्या घोषणांनी संपूर्ण बसस्थानक दुमदुमून गेले.

कार्यक्रमादरम्यान आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुणे, प्रवासी तसेच चालक-वाहक यांचे स्वागत केले. शेवटी आगारातील कर्मचारी सैय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले.