जागतिक ग्राहक दिनानिमित्त वर्ध्यात कार्यक्रम; स्वामी विवेकानंदांना अभिवादन

Thu 26-Mar-2026,02:56 AM IST -07:00
Beach Activities

जागतिक ग्राहक दिनानिमित्त वर्ध्यात कार्यक्रम; स्वामी विवेकानंदांना अभिवादन

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वर्धा यांच्या वतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण

दि. २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सेवाग्राम रोड येथील जिल्हा समाजकल्याण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा न्यायाधीश श्रीमती वैशाली आर. गजभिये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) विवेक दा. देशमुख, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी व सदस्य सचिव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद राजू रणवीर उपस्थित होते.

तसेच किशोर मुटे (विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य व सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद), ॲड. श्रीमती विभा देशमुख (विधी सल्लागार, अखिल भारतीय ग्राहक परिषद), विनोद पोटे (सचिव, अखिल भारतीय ग्राहक परिषद, वर्धा), सौ. उषा फाळे (अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद, वर्धा) व अजय भोयर (सचिव, अखिल भारतीय ग्राहक कल्याण, विदर्भ शाखा) यांचीही उपस्थिती होती.

यानंतर वैध मापन विभाग, वर्धा यांच्या वतीने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात ग्राहक हक्क, जनजागृती व संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.