अग्यात इसम ने काढली शाळकरी मुलीची छेड,मुलीने दिली पोलिसात तक्रार
 
                                    
                                प्रतिनिधी महेन्द्र उमरझरे नरखेड
नरखेड:राऊत परसोडी येथे भर दुपारी अग्यात इसम ने काढली एका शाळकरी मुलीची छेड मुलीनी आरडाओरडा केल्याने मोठा प्रसंग होतांना वाचला मुली ने दिली पोलिस तक्रार पोलीस स्टेशन नरखेड येथे हजर येऊन आपली तोंडी रिपोर्ट देतो की,वरील नमूद पत्त्यावर आई- वडिलांचे सह राहतो व श्री पंढरीनाथ कला व वाणिज्य महाविद्यालय नरखेड येथे डी एल एड डीएड प्रथम वर्षाला घेत आहे व रोज परसोडी राऊत वरून सायकलने कॉलेज साठी नरखेड येथे येणे जाणे करतो. आज दिनांक 07/01/2025 रोजी सकाळी 10:30 वाजता सुमारास मी श्री पंढरीनाथ कला व वाणिज्य महाविद्यालय नरखेड येथे सायकलने आली होती व कॉलेज मधून अंदाजे दुपारी 03/00 वाजता सुमारास नरखेड वरून गावी परसोडी राऊत येथे सायकलने जात असताना अंदाजे 03:45 वाजता सुमारास खोजे यांचे शेताची जवळ परसोडी शिवारात एक अनोळखी मोटर सायकलवर एक मानुस माझे सायकलचे मागुन आला आणि रस्यावर कोनीडी नसल्याचे बघुन त्याने माझे छातीला हात लावला, मी त्यास काय आहे असे म्हटले असता तो काही बोलला नाही.मी घाबरुन माझी सायकल जोरात चालवुन सामोर निघाली असता त्याने परत माझे जवळ येवुन माझे तोंडाला बांधलेला दुपट्टा ओढला तेथे पोल्ट्री फार्म असल्याने मी तेथे थांबली व जोराने आवाज दिला.त्यामुळे तो अनोळखी मोटर सायकल वरील मानुस तेथुन त्याची मोटर सायकल वळवुन नरखेड कडे पळून गेला. त्यानंतर मी घरी आली व माझे वडिलांना घडलेली हकीकत सांगून त्यांच्यासह पोलीस स्टेशन नरखेड येथे रिपोर्ट देण्यात आली आहे.सदर अनोळखी मोटरसायकल चालकाचा गाडी नंबर मला बघता आला नाही सदर व्यक्तीस मी पाहिल्यास त्याला ओळखू शकते तक्रार दिल्या नंतर बी एन एस 74,बी एन एस 75(2),बी एन एस 78(2)सदर व्यक्ती विरोधात कलम लावण्यात आली आहे पुढील तपास नरखेड पोलिस स्टेशन करत आहे.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            