बोरगाव (मेघे) येथे ज्येष्ठ नागरिकांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

Wed 01-Jul-2026,03:04 AM IST -07:00
Beach Activities

बोरगाव (मेघे) येथे ज्येष्ठ नागरिकांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

बोरगाव (मेघे) येथील उत्साही गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने १ जुलै रोजी ज्येष्ठ नागरिकांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचे योगदान मोलाचे असून त्यांचा अनुभव हा समाजासाठी अमूल्य ठेवा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही यांनी केले.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना इमरान राही म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक हे केवळ वयाने मोठे नसून कुटुंब व समाजाचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्ट, त्याग आणि अनुभवामुळे आजची पिढी सक्षम झाली आहे. जीवनातील चढ-उतारांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा ज्येष्ठांकडून मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील चापके होते. यावेळी गणेशभाऊ अतकर, दिलीपभाऊ कावलकर, बुद्धपाल कांबळे, स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे सचिव शिहान मंगेश भोंगाडे, मोहनराव मोहिते, रमेशराव सायंकार, दामोदरराव सेलूकर, राजेश बारई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित करत मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी तुळशीदास देशमुख, सरोदे, भोयर, अशोक महाजन, नवले, इंगोले, हरीश पाटील, दांडारे, भोंग, हजारे, पोहनकर आदींसह अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कोरडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक कडू यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्साही गुड मॉर्निंग ग्रुप, योगा ग्रुपचे सभासद तसेच महिला व पुरुष सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.