युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Tue 30-Jun-2026,02:53 AM IST -07:00
Beach Activities

युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

वर्धा : प्रतिनिधी इरशाद शहा

युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. निहाल भाऊ पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व भेटवस्तू वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, शैक्षणिक साहित्य तसेच इतर आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. "विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक आणि डोळ्यांत स्वप्न असेल, तर गावाचा आणि समाजाचा विकास निश्चित होईल," अशी भावना व्यक्त करण्यात आली. तसेच "फक्त शालेय साहित्य वाटप नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा, मार्गदर्शन आणि सहकार्य देणे हा संघटनेचा संकल्प आहे," असेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेच्या सौ. रंजना कलोडे मॅडम, सौ. ज्योती सिराम मॅडम, नियोजन समिती अध्यक्षा सौ. चंदा भोयर, अंगणवाडी शिक्षक सौ. सविता जगताप मॅडम, सौ. रंजना नागापुरे, युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. निहाल भाऊ पांडे, जिल्हा संघटक मा. दिनेश भाऊ परचाके, तालुका उपाध्यक्ष इरशाद शाह तसेच अमन नारायाने, गौरव येटे, सुरज गेडाम, अभय म्हैसकर, ओम किन्नाके, तेजस उईके, सोहेल पठाण, प्रतीक परचाके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.