रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार शस्त्रासह जेरबंद; वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई

Tue 30-Jun-2026,02:35 AM IST -07:00
Beach Activities

रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार शस्त्रासह जेरबंद; वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध (डीबी) पथकाने धडक कारवाई करत रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराला प्राणघातक शस्त्रासह ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश आले असून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची सतर्कता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथील डीबी पथक परिसरात नियमित पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, स्टेशनफैल परिसरातील रहिवासी सोहेल ऊर्फ आफताब अखील खान हा कोचर मैदान, गणेशनगर येथे प्राणघातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करत असून कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत आहे.

माहितीची खातरजमा करून डीबी पथकाने तत्काळ कोचर मैदान, गणेशनगर येथे सापळा रचला. संशयितास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे २०० रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ९०८/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, तसेच पोलीस शिपाई वैभव जाधव आणि श्रावण पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.