सोलर पॅनल बसवताना सावधान! एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नका

Sat 20-Jun-2026,10:26 PM IST -07:00
Beach Activities

सोलर पॅनल बसवताना सावधान! एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नका

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा जिल्ह्यात सोलर पॅनल बसविण्याचे प्रमाण वाढत असताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.अनेक ठिकाणी एका कंपनीचा किंवा विक्रेत्याचा परवाना असताना प्रत्यक्ष काम मात्र दुसऱ्याच व्यक्तीकडून घेतले जात असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही विक्रेते एजंटांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत एजंट काम मिळवून देतात आणि त्यावर त्यांचे कमिशनही तयार होते. मात्र ग्राहकांनी यामध्ये सावध राहणे आवश्यक आहे

सोलर पॅनल बसवण्यापूर्वी संबंधित विक्रेता अधिकृत आहे

का, त्याची नोंदणी, कार्यालयाचा पत्ता आणि सेवा सुविधा उपलब्ध आहेत का याची खात्री करून घ्यावी. अनेकदा एजंटमार्फत काम दिल्यानंतर काही वर्षांनी तांत्रिक बिघाड झाल्यास ग्राहक एजंटशी संपर्क साधतात, मात्र त्यावेळी जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ केली जाते.

त्यामुळे सोलर पॅनल बसवताना मध्यस्थ किंवा एजंटांवर अवलंबून न राहता, ज्या कंपनीचा किंवा विक्रेत्याचा अधिकृत परवाना आहे

त्यांच्याशी थेट संपर्क साधूनच काम करावे, असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे.

सोलर पॅनल बसवण्यापूर्वी अधिकृत विक्रेत्याची खात्री करा... अन्यथा भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याचाच फटका सावंगी मेघे येथील जुन्या वस्तीत राहणारे विक्की नेवारे यांना बसल्याची माहिती समोर आली आहे. 

सोलर पॅनल बसविण्याच्या प्रक्रियेत त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी HT News India शी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.

बातमी प्रसिद्ध होताच संबंधितांकडून दखल घेण्यात आली असून सध्या विक्की नेवारे यांच्या घरी सोलर पॅनल बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे