काचनगाव जिल्हा परिषद शाळेत नावीन्यपूर्ण पद्धतीने शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

Fri 03-Jul-2026,01:59 AM IST -07:00
Beach Activities

काचनगाव जिल्हा परिषद शाळेत नावीन्यपूर्ण पद्धतीने शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

हिंगणघाट | प्रतिनिधी (सुनील हिंगे, अल्लीपूर 

हिंगणघाट तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, काचनगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ९ वाजता बँड पथकाच्या गजरात बैलगाडी व घोड्यावरून प्रभातफेरी काढण्यात आली. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना नवीन गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यानंतर जिलेबी, मिठाई व वटाणा-भाताच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश कापसे, सरपंच नंदाताई चिंचूलकर, मुख्याध्यापक कुरटकर, मोघे, धुर्वे, काकडे व मांढरे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.