गडचिरोली अँथलेटिक संघटने तर्फे २ फेब्रु. ला सब जुनियर जिल्हास्तरीय स्पर्धा
जील्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:- महाराष्ट्र राज्य अँथलेटिक संघटनेद्वारे आयोजित वार्षिक सबज्युनिअर क्रीडा स्पर्धेचे आयोजन पंढरपूर येथे केलेले आहे सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता गडचिरोली जिल्ह्यातील संघाची निवड चाचणी २ फेब्रुवारी २०२५ रविवार ला सकाळी ७:०० वाजता पासून एम.आय.डी.सी. ग्राउंड कोटगल रोड ,गडचिरोली येथे आयोजित केलेली आहे सदर स्पर्धेत वय वर्ष ८,१०,१२,१४ वर्षा आतील मुले व मुली सहभागी होऊ शकतात खेळाडूंकरिता विविध वयोगटात ५० मिटर,६०मिटर,८० मिटर,३००मिटर धावणे, लांबउडी, गोळाफेक स्पर्धेत सहभागी होऊ शकतात सदर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग होण्याची संधी मिळणार आहे तरी या स्पर्धेत जास्त संख्येने विद्यार्थ्यांना सहभाग घेण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा अँथलेटिक्स संघटनेचे सचिव आशिष नंदनवार सर यांनी केलेले आहे .
Related News
ज्ञानदा हायस्कूल ची अंडर 14,17,19, मुले व मुली विभाग स्तरिय मैदानी स्पर्धेकरिता निवड
16-Oct-2025 | Sajid Pathan
अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत अग्रवाल विज्ञान महाविद्यालयाच्या मुलींची बाजी
09-Oct-2025 | Sajid Pathan
ज्ञानदा हाईस्कूल की अंडर 14, 17 लड़के व लड़कियों की जिला स्तरीय मैदान प्रतियोगिता हेतु चयन
26-Sep-2025 | Sajid Pathan