एसटी महामंडळाच्या बसने शेतकऱ्यांच्या दोन म्हशीला जोरदार धडक दोन्ही म्हशी जागीच ठार
 
                                    
                                प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
यवतमाळ:घाटंजी घटना दिनांक 25/02/2025
शेतकरी दिगंबर पोटे यांच्यावर उपासमारीची वेळ महामंडळाच्या बसने मोडले शेतकऱ्यांचे स्वप्न शेतकरी दिगांबर पोटे हे त्यांच्या दोन मुरा म्हशी व चार बैल शेतातून सायंकाळी घेऊन घराच्या दिशेने चालले होते रस्त्याच्या बाजूने चालत असताना समोरून भरधाव वेगाने महामंडळाची बस क्रमांक MH40Y5783 ही बस आली व रस्त्याच्या विरुद्ध दिशेने रस्त्याच्याकडेने जात असलेल्या दोन मुर्रा म्हशीला उडवले यामध्ये त्या दोन्ही म्हशी जागीच ठार झाल्या घटनेचे आवाज एवढा होता की सोबत असलेले चार बैल हे सैरावैराहून तिथून पसार झाले यामुळे शेतकऱ्यावर आधीच शेतीमध्ये पावसामुळे बराच तोटा झाला सोबत शेती सोबत जोडधंदा करावा म्हणून काही दिवसा आधीच या म्हशीची खरेदी केली होती या दोन्ही म्हशी बस धडकेत मृत झाल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे,शेतकऱ्यांनी जोडधंद्यातून दोन पैसे कमावून सुखी आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नाचा एसटी महामंडळाने चुराडा केला आहे.सदर घटना दिनांक 25/02/2025 रोजी सायंकाळी अंदाजे 6.45 या दरम्यान घडली, ही घटना यवतमाळ ते घाटंजी रोडवर विठ्ठलराव मेंढे यांच्या शेताजवळ समोरून वडगाव गावाकडून घाटंजी कडे जाणारी राज्य महामंडळाची बस भरधाव वेगाने येत होती. सदर बस रोडच्या विरुद्ध दिशेने येऊन दोन्ही म्हशीला जोराने धडक मारली त्यामुळे धडक एवढी तीव्र होती की बलाढ्य अशा म्हशी जागीच मरण पावल्या. काही वेळाने सदर घटनास्थळावर पोलीस आले तेव्हा पोलिसांनी बस चालक गुरुप्रसाद भगवान झूमनाके व गावकऱ्यासमक्ष घटनास्थळ पंचनामा कार्यवाही शांततेत पार पाडत असताना याच गावातील रहिवासी दिगांबर मेश्राम राहणार वडगाव पोलिस स्टेशन यांनी पोलिसांना कोणती सूचना न देता बस चालक गुरु प्रसाद भगवान जुमनाके यास स्वतःच्या चार चाकी वाहनाने बसून आरोपीस पळून जाण्यास मदत केली.यानंतर दिगंबर मेश्राम यांचे अश्या कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोश निर्माण झाला व गावातील शेतकऱ्यांनी सादर प्रकार पोलिसांच्या लक्षात आणून दिला, शेतकऱ्यांनी दिगांबर मेश्राम यांनी व बस चालक यांनि संगनमताने तर माझ्या म्हशी ठार मारल्या असेल अशी शंका व्यक्त केली,आरोपी बस चालकास घटनास्थळावरून पळून लावल्यामुळे घटनास्थळावर कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम दिगंबर मेश्राम यांनी केले गोंधळाची परिस्थिती घटनास्थळावर निर्माण झाली, पोलीस अंमलदार यांना बस चालक मेश्राम यांनी गाडीतून पडविले कळताच त्यांनी दिगांबर मेश्राम यांच्या मोबाईलवर संपर्क करून त्यास कायद्याचा धाक दाखवला व ताबडतोब आरोपी बस चालक यास घटनास्थळावर आणून सोडण्यास सांगितले जवळजवळ अर्धा ते एक तासानंतर दिगंबर मेश्राम याने आरोपी ड्रायव्हरला घटनास्थळावर सोडून स्वतः पळ काढला पोलिसांच्या या प्रसंग सावधानाने मोठा अनर्थ टळला,अन्यथा गावकरी व शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतला असता, एवढा भीषण अपघात होऊन सुद्धा शेतकऱ्यांनी किंवा गावकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे बस चालक किंवा पॅसेंजर कोणालाही इजा पोचवली नव्हती. आता पोलिस यंत्रणेकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे दिगंबर मेश्रामने पोलिसांचे शासकीय कामात अडथळा आणला असता त्यावर कोणती कारवाई केल्या जाते तसेच राज्य एसटी महामंडळाच्या बस चालकांवर कोणती कारवाई होणार की असेच राज्य एसटी महामंडळाचे ड्रायव्हर बेभान बस चालवत लोकांच्या व जनावरांच्या जीवाशी खेळणार
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            