प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद काटोल पोलीसांची कारवाई
 
                                    
                                प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
नागपुर:पोलीस स्टेशन काटोल दिनांक २३/०४/२०२५ रोजी पोस्टे काटोल पोलीस पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदारद्वारे माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या रेनॉल्ट डस्टर कार क्रमांक एम. एच. ३१ इ.यु ४२२२ या वाहनाने प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची वाहतुक होत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसानी नरखेड ते काटोल रोड मौजा घुबडमेट चौक येथे नाकाबंदी केली असता रेनॉल्ट डस्टर कार कमांक एम एच ३१ इ.यु ४२२२ येतांना दिसली. सदर वाहन थांबवुन पंचासमक्ष वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये मागील सिटवर विक्रीसाठी वाहतुक होत असलेला १ सुगंधित तंबाखु जाफरानी जर्दा १ किलो वजनाचे १०० पाकीटे आणि २. सुगंधित तंबाखु गोल्डन सफारी चे १० पाकीटे आढळुन आले. वाहन चालक आरोपी नामे प्रविण पांडुरंगजी उज्जैनकर, वय ३२ वर्ष रा. प्लॉट क २६, न्यु इंदीरानगर नविन नरसाळा रोड, नागपुर याला वाहनात मिळुन आलेल्या प्रतिबंधीत तंबाखु बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.आरोपीचे ताब्यातुन १ सुगंधित तंबाखु जाफरानी जर्दा १ किलो वजनाचे १०० पाकीटे किंमती ५५,०००/- रूपये, २. सुगंधित तंबाखु गोल्डन सफारी चे १० पाकीटे किंमती ५५००/- रूपये आणि ३. रेनॉल्ट डस्टर कार कमांक एम एच ३१ इ.यु ४२२२ किंमती ५,००,०००/- रूपये असा एकुण ५,६०५००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नमुद आरोपीविरूद्ध पोस्टे काटोल येथे भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २२३ सह कलम अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे. नमुद आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            