उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट यांच्या पथकाची अवैध धंद्यावर व दारुबंदी विरोधात धडक कार्यवाही
 
                                    
                                प्रतिनिधि आसीफ मलनस हिंगणघाट
वर्धा:उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, हिंगणघाट यांचा पथकाला पो.स्टे. हिंगणघाट हद्दीत अवैध धंद्यांवर कार्यवाही करिता पेट्रोलींग करीत असतांना एक चार चाकी टाटा एस कंपनीची गाडी क्र MH 32 Q 221 पिवळ्सर रंगा ची ही विदेशी दारू ची मौजा नागरी , तालुका - वरोरा, जि चंद्रपूर कडून मौजा हिंगणघाट कडे वाहतूक करून येत आहे असे गुप्त बातमीदाराचे मिळालेल्या विश्वसनीय खबरेवरुन उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालयातील पथकाने सदर ठिकानी जावुन नाकेबंदी केली असता खबरेप्रमाणे एक चार चाकी टाटा एस कंपनीची गाडी क्र MH 32 Q 221 पिवळ्सर रंगा ची ही येतांना दिसली तिला पो स्टाफचे मदतीने थांबविले व त्यांचं नाव विचारलं असता त्यानं आपलं नाव 1) आमिर राशिद खान पठाण ,रा. निशानपुरा वॉर्ड ,हिंगणघाट , 2) शुभम गजानन तोडासे ,रा. निशानपुरा वॉर्ड ,हिंगणघाट असे सांगितले व सदर गाडी ची पोलीस स्टाफ ने पाहणी केली असता गाडीच्या केबिन मध्ये 5 खर्डाच्या खोक्यात रॉयल स्टॅग कंपनी च्या विदेशी दारू चा माल कि 72,000/ व 1 कार्ल्सबर्ग कंपनीची विदेशी दारू बियर चा खर्डा कि 7200/ व गाडी कि 200000 / असा एकुण जु.किं. 2,79,200/- रु.चा माल मिळुन आल्याने आरोपीतान विरुध्द पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब व अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे सा. यांचे मार्गदर्शनात रोशन पंडित उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नि प्रेमराज अवचट, पो.हवा. अश्विन सुखदेवे, पो. हवा. उमेश लडके, ना.पो.शि रवींद्र घाटुर्ले ,पो. शी. भारत बुटलेकर , यांनी केली.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            